तर गेले काही वर्षांपासून मी मोठ्या trip ला गेल्यावर त्याचे प्रवासवर्णन लिहिते.. माझ्यापुरते..माझ्या diary त! त्याचा उद्देश एकाच असतो की ५..१०..१५..वर्षांनी ते वाचल्यावर परत ते स्थळ,ते वय, तो काळ जगता यावा! कारण काळाच्या ओघात अनेक बारीकसारीक तपशील आपण विसरून जातो! फोटोच्या रुपात काही आठवणी ताज्या राहतात पण सगळेच क्षण काही फोटोत बंदिस्त होऊ शकत नाहीत!
तर ह्यावेळी आम्ही मित्र-मैत्रिणींनी एप्रिलमध्ये युरोपमध्ये रोड trip केली…जर्मनीपासून निघून Amsterdam-Rhine Falls-Austria-Budapest-Prague असे करून जर्मनीत परत आलो..मुलांशिवाय केलेली (कदाचित पहिलीच!) हि trip आम्हा ६ जणांना परत कॉलेजच्या दिवसात घेऊन गेली!!
खूप मजा मस्ती केली..धमाल गमती-जमती अनुभवल्या! अचानक पणे Tulip च्या शेतात जायला मिळणे.. Austriaत मधेच पोलिसांनी गाडी checking ला अडवणे.. प्रचंड गार बोचऱ्या वाऱ्यात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे सकाळपासून रात्रीपर्यंत बुडापेस्ट मध्ये फिरणे..तिथल्या हॉटेल मध्ये part-time waitress चा job करणारी मुलगी पुण्यातील निघणे..Prague मध्ये पडलेल्या तुफान पाऊस आणि थंडीमुळे तिथून अक्षरशः पळ काढावा लागणे.. रात्री 12 वाजता कुठलेच transport न मिळाल्यामुळे तिथल्या अनोळखी, सुनसान रस्त्यावरून जीव मुठीत धरून ४-५ की.मी. हॉटेलपर्यंत चालत येणे..
आणि महत्वाचे म्हणजे आमची ‘black beauty’- Mercedes V-class हि गाडी मिळवण्यासाठी आनंद-गौरीने ‘बेललेले पापड!’… त्यानंतर न थकता उत्कृष्ट,एकहाती आनंदने केलेले ५००० किमी चे driving! गौरीचे त्यांच्या जर्मनीच्या घरचे प्रेमळ आदरातिथ्य..
सचिनची मुंबईतील ‘भाईगिरी’… तर पूर्वाची फोटोंची धमाल! योगायोगानी प्रत्येक जोडप्याने येताना आपापसात same च केलेला ‘अलिखित करार!’….अशा एक न अनेक किती गोष्टी सांगू…
ट्रीपमध्ये वेळोवेळी माझे हे सर्व diary त लिहिणे चालूच होते.. आणि मग सर्वांच्या आग्रहातून हि कल्पना आली की ह्यावेळी हे अनुभव इतरांबरोबरही share करावेत.. म्हणून हा ‘blog’प्रपंच!
तर मला सगळ्यात आवडलेला देश..Austria बद्दल मी इथे पुढील ६ दिवस रोज लिहिणार आहे!
हा माझा पहिलाच प्रयत्न आहे..तेव्हा कसा वाटला ते जरूर मला कळवा!

Very nice!…Looking forward for more…Keep exploring!…Keep writing!!👍
LikeLike
Thank you
LikeLike