भाग १- Inssbruck

हा खरतर आमच्या प्रवासाचा पहिला दिवस नाही! पण सुरुवात इथूनच करणार आहे मी..कारण  Europe मधील सृष्टीसौन्दार्याचा उच्चांक, परिसीमा, सर्वोत्तम  जे काय म्हणून असते ते इथेच ‘याची डोळा याची देहा’ दिसले! त्या दिवशी सकाळी तशी आरामातच उठले..रात्री खूप उशिरा जर्मनीमधून Austria तील inssbruck जवळच्या tulfes ह्या गावातील Hotel  Gasthof Neuwirt  मध्ये check-in केले होते. रात्रीच्या अंधारात एवढेच समजत होते की फक्त वळणावळणाच्या रस्त्यानी वर उंचावर चाललो आहोत. खाली inssbruck गाव दिसत होते आणि वर गडद निळे आकाश! बस! गावात सगळीकडे सामसूम झाली होती..रात्रीचे ९-९.३० झाले होते.

हॉटेल्स आणि दुकाने तर कधीच बंद झाली होती. आमच्या Hotel च्या reception वर कुणीच नव्ह्ते.मग त्याच्या manager ला फोन केला.. तर त्याच्या झोपेची मध्यरात्र झाली होती! टेबलवर तुमच्या नावाच्या चिठ्या आणि रुमच्या किल्या ठेवल्या आहेत…हॉटेल मागच्या मोकळ्या जागेत कार पार्क करू शकता…एवढे बोलून त्याने फोन ठेवला! मग त्याला असे झोपेतून उठवल्याबद्दल चार वेळा sorry बोलून दुसऱ्या मजल्यावरच्या रूम मध्ये जिन्याने bags ओढत घेऊन गेलो! सगळ्यांनाच भूक लागली होती.. तेव्हा खाली inssbruck मध्ये जाऊन vapiano ह्या Italian restaurant मध्ये जाऊन जेवायचे ठरवले. हे हॉटेल गावातील एका  मोठ्या shopping/commercial area मध्ये होते….तिथे ikea आणि इतर अनेक branded दुकाने होती. Offices होती..hotels होती. पण उशीर झाल्यामुळे काही hotels तर काहींची kitchens बंद झाली होती. फक्त एक late night चालू असलेले Macdonalds  दिसले आणि हुश: झाले! जेवण करून हॉटेल वर आलो….हॉटेल शेजारीच जरा नवीन धाटणीचे छोटेसे church होते.. आणि त्याला लागून होती दफनभूमी!! रात्रीचे १२ वाजले होते गाडी पार्क करून त्याच्या शेजारून येताना जरा भीतीच वाटली..वर येऊन गुपचूप झोपलो!

हा.. तर ह्या अश्या सगळ्या पार्श्वभूमीवर सकाळी तशी आरामातच उठले..

खिडकीचे पडदे उघडले आणि balconyचे दार उघडून बाहेर आले.. आणि समोरचे दृश्य बघून आपण अजून स्वप्नात आहोत का खरच जागे आहोत तेच समजेना!!! २ मिनिटे स्तब्धपणे समोरचा तो निसर्गाचा अविष्कार बघत बसले!! भानावर आले तेव्हा पहिल्यादा हाका मारून अमोल ला बोलावले.

त्या रात्रीच्या अंधारात एवढे काही मनोहारी आपल्या शेजारीच आहे याची पुसटशीही कल्पना आली नव्हती!

तर..मी जिथे उभी होते त्या balcony पासून जिथवर नजर लांब जात होती तिथे चहूबाजूंनी उंच पर्वत दिसत होते. आणि प्रत्येकाच्या डोक्यावर पांढरा मुकुट घातल्याप्रमाणे बर्फाने आच्छादन केले होते.त्याच्यामागे आकाशाच्या निळाईवर मधून मधून पांढरेशुभ्र ढगांचे गुच्छ होते. पर्वताच्या पायथ्यापर्यंत हिरवीगार कुरणे पसरली होती..त्यात अधेमधे छोटी पिवळी फुले उमलली होती..कुरणांना मधूनच एखादे खुरटे बांबूचे कुंपण छेदून जात होते..पर्वताच्या पायथ्याशी pine ची झाडे होती..बर..त्यातपण..कुराणाचा, झाडाचा, पर्वतावरील झाडांचा प्रत्येकाचा आपलाच असा वेगळा हिरवा रंग होता.. कुरणात चरणाऱ्या गायींच्या गळ्यातील नाजूक वाजणाऱ्या घंटा..मधूनच किलबीलणारे पक्षी..अहाहा..स्वर्गीय आनंद होता हा! डाव्या बाजूला गावातून जाणारा रस्ता होता.. त्याच्या बाजूनी दुमजली उतरत्या छपरांची कौलारू लाकडी टुमदार घरे होती..त्यामागे असलेल्या उतरत्या डोंगरावर winter मध्ये skiing केले जाते.

मग तिथेच balcony मध्ये असलेल्या coffee table वर निवांत बसून खूप वेळ हे नयनसुख घेत राहिले..

नंतर पुढे 3 दिवस हि अशी आणि यापेक्षा कितीतरी सुंदर अनेक दृश्ये सबंध ऑस्ट्रियाभर पाहायला मिळाली पण म्हणतात ना ‘पहिली बार एकही बार आता है! त्याप्रमाणे ऑस्ट्रिया चे हे पहिले दर्शन खास  आठवणीत राहिले.

आज checkout करून Salzberg ला जायचे होते. आणि जाताना Swarovski Crystal World बघायचे होते..आमचे हॉटेल स्वरोस्की पासून १०-१५ मिनिटाच्या अंतरावर होते. पटापट breakfast उरकून सामान गाडीत load केले.निघे पर्यंत १०.३० वाजले होते. काल रात्री पाहिलेली चर्च शेजारची ती थडगी चक्क आज अजिबात घाबरवत नव्हती!!

ह्यावेळी आम्ही मुख्य inssbruck गावात गेलो नाही.. Inssbruck हे ऑस्ट्रिया मधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ऑस्ट्रियाच्या पश्चिमेकडे असलेले हे गाव Alpsच्या पर्वतरांगांनी वेढलेले wintersports चे खास आकर्षण आहे.हे त्याच्या imperial आणि modern architecture साठी सुद्धा प्रसिध्द आहे. हे Tyrol stateचे capital आहे. इथे बरेचसे लोक german भाषा बोलतात. Switzerland मधील Alps पर्वतात उगम पावलेली Inn नावाची नदी ह्या शहरातून वाहते! तर swarovski बद्दल उद्याच्या post मध्ये लिहिते!

बाल्कनी तून दिसणारा हाच तो अप्रतिम view!!
आणि हा डावीकडचा रस्ता..
हॉटेल मधून दिसणारा अजून एक view..
Unknown's avatar

Author: deepaliparanjape

An architect by profession..love to travel & explore new things..colours in nature fascinates me!!

One thought on “भाग १- Inssbruck”

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started