भाग ३- BAD GOISERN -HALLSTATT

लांबवर पसरलेली हिरवीगार कुरणे, त्यांना वेढून असलेल्या बर्फाच्छादित alps च्या पर्वतरांगा, उतरत्या छपरांची लाकडी घरे, अधूनमधून दर्शन देणारी निळीशार lakes हे Austrian landscape चे वैशिष्ट्य आहे.

हे असे नजारे वळणावळणावर बघत swarovski बघून झाल्यावर salzberg च्या दिशेने निघालो. वाटेत एका gas station वर lunch break घेऊन hallstatt जवळील Bad Goisern या गावात पोचलो. Bad Goisern यायच्या आधी थोडा वेळ आमच्या गाडीचे satellite navigation slow झाले आणि आम्ही एक वळण चुकलो! परत मागे येण्यासाठी एका गावात शिरून मग highway खालच्या रस्त्यानी मागे वळता येणार होते. पण ती चूक आमच्या चांगलीच पथ्यावर पडली कारण ते गाव इतके सुंदर होते!! अशी हि offbeat countryside गावे खरच इतकी सुंदर असतात ना!

Bad Goisern हे छोटेसे, शांत पण खूप scenic गाव आहे. इथे पोहोचेपर्यंत संध्याकाळचे ५ वाजले.. आमच्या हॉटेल जवळूनच एक छोटा खळाळता ओढा वाहत होता. जवळच एक बाग होती! एक शाळा पण होती! बाजूला राहती घरे होती..हॉटेल च्या बाल्कनीतून परत माझ्या लाडक्या alps चे दर्शन घडतच होते! 

Hotel Pension Maria Theresia हे आमचे हॉटेल दुमजली टुमदार घरासारखे होते. समोर बाग..त्यात बागकाम करणारी आजीबाई..(कदाचित host ची आई असावी) उन्हात खुर्ची टाकून बसलेले आजोबा.. २-४ पायऱ्या चढून गेल्यावर एक व्हरांडा..आत गेल्यावर छोटीशी ६ टेबलांची breakfast-dining area..शेजारीच छोटेसे kitchen..पुढे जीन्यानी वर गेल्यावर खोल्या! जिन्याशी एक छोटेसे reception! हॉटेलच्या मागे आणि उजव्या बाजूला बर्फाच्छादित alps! General च इकडेतिकडे उगवलेली नाजूक व अप्रतिम रंगांची tulips ची फुले!! अगदी सिनेमात असते तसे location होते..

भराभर bags खोलीवर टाकून आम्ही Hallstatt ला जायला निघालो. you tube वर ह्याचे खूप videos बघितले होते.

१०-१५ मिनिटाच्या drive नंतर Hallstatt आले. मोठ्या ‘hallstatt’ lake च्या आजूबाजूला वसलेले हे Hallstatt गाव tourist चे आवडते destination आहे. UNESCO ने world heritage site  म्हणून घोषित केले आहे. आम्ही पोहचलो तेव्हा संध्याकाळचे ५.३० झाले होते. हवेत गारठा वाढला होता..आजूबाजूला पुष्कळ चीनी लोक दिसत होती! पार्किंग lake पासून थोडे लांब मिळाले होते..

lake पाशी पोचलो तेव्हा परत एखाद्या  स्वप्नातल्या गावात आल्यासारखे वाटले. अथांग असे निळेशार पाणी असणारे ते lake..त्याच्यामागे भव्य-दिव्य असे भासणारे हिरवेगार पर्वत…त्यांच्या डोक्यावर बर्फ..आणि अश्या backdrop वर वसलेले हे राखाडी छपरांचे गाव.. अगदी ‘picture perfect’ म्हणावे असे!! लगेच तिथेच water colours काढून painting करत बसावे असे!!

lake च्या डाव्या बाजूनी मस्त झोकदार वळण घेत एक रस्ता जात होता. त्या वाटेनी आम्ही चालू लागलो..रस्त्याच्या उजव्या हाताला lake..तर डावीकडे डोंगरावर वर वर चढत जाणारी घरे  आणि अनेक shops, cafes होते. जमिनीचा एक तुकडा मधूनच lake च्या पाण्यात घुसला होता आणि तिथे असलेल्या एका चर्चचा सुळक्यासारखा वर आलेला bell tower त्या skyline मध्ये  खूपच सुंदर दिसत होता.. त्याचे ..पर्वतांचे..पाण्यात पडणारे ते प्रतिबिंब तर लाजवाबच!!

 तो निवांतपणा..ती शांतता..ती निसर्गाची भव्यता..मनात हळूहळू झिरपवत आम्ही lake च्या कडेनी कितीतरी वेळ चालत राहिलो!

त्या गार हवेत कॅफेतून मधूनच येणारा तो coffee beans चा वास मनाला तरतरी देत होता!! संध्याकाळचे ७-७.३० वाजले होते..तरी भरपूर उजेड होता..भूक लागली होती..तेव्हा रस्त्याच्या कडेला टेबल-खुर्च्या मांडून ठेवलेल्या एका कॅफे कम resto मध्ये गेलो. आज Europe मधील speciality असलेले पदार्थ खायचे ठरवले. तेव्हा chicken schnitzel, fish n chips असे मागवले. आणि इथली special अशी gluehwein  म्हणजेच दालचिनी flavour ची गरम वाफाळती wine प्रथमच प्यायली!

मस्त जेवण करून hallstatt ची हि दृश्य मनात घोळवत परत Bad Goisern च्या दिशेने लागलो.

जाताना मागच्या डोंगरावर एक funicular (म्हणजे उतरत्या डोंगरावरची रेल्वे..)दिसली! इथे आहे प्रसिद्ध salt mine!

Hallstatt ह्या गावाला निसर्गाची अजून एक देणगी लाभली आहे ती म्हणजे इथल्या पर्वतात असलेले मिठाचे साठे! सुमारे ७००० वर्षापूर्वी इथे मिठाचे साठे सापडले. जगातील सर्वात जुनी आणि अजून चालू असलेली salt mine आहे हि! आणि ह्या salt mineची एक छान tour आहे. आम्ही इथे गेलो नाही पण हि मिठाची खाण नक्कीच बघण्यासारखी आहे! पर्वताच्या पोटातील ह्या खाणीत २१ माजले आहेत त्यातील 3 च tourist ना बघायला open आहेत. विविध प्रकारचे salt stones इथे आहेत. आणि त्यात ९०% पर्यंत मिठाचा अंश आहे. याशिवाय युरोपमधील सर्वात जुना लाकडाचा जिना..आणि ‘man in salt’ हि ह्या mine ची खासियत आहे. (म्हणजेच prehistoric काळातील १८ व्या शतकात सापडलेली एका minerची ‘well preserved body’ इथे आहे)

जवळच २०१३ मध्ये बांधलेला sky walk आहे. खाली वसलेल्या Hallstatt च्या घरांच्या वर ३६० मी. उंचीवर हा बांधला आहे. इथून पूर्ण Hallstatt गाव अतिशय अप्रतिम दिसते! श्वास रोखून बघायला लावणारा हा point ‘not to miss’ यादीत आहे!

lake hallstatt…
डावीकडचा रस्ता आणि डोंगरावर चढत जाणारी सुंदर लाकडी घरे…
आमचे हॉटेल Pension Maria Theresia
Unknown's avatar

Author: deepaliparanjape

An architect by profession..love to travel & explore new things..colours in nature fascinates me!!

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started