तर दुपारी एक वाजता Bad Goisern हून salzberg ला पोचलो.पार्किंग lot मध्ये कार पार्क करून hop on hop off च्या बस stop वर गेलो. बसच्या तिकीटाबरोबरच त्याच्या stops चा एक map मिळाला. हातात असलेल्या वेळावरून बघायची ठिकाणे निश्चित केली.
कुठल्याही नवीन शहरात आपापले फिरण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. ह्या बसेस त्यांच्या ठराविक मार्गांवरून सतत फिरत असतात आणि त्या मार्गावरील ठरलेल्या प्रेक्षणीय स्थळाच्या stop पाशी आपल्याला उतरवतात किंवा घेतात. प्रत्येक seat ला headphone दिलेला असतो! त्यात आजूबाजूला दिसणाऱ्या परिसराची commentry चालू असते! त्यामुळे बस मध्ये बसल्याजागी त्या city ची खूप माहिती मिळते. त्यात अनेक भाषांचा पर्याय असतो. आपण आपल्याला हवी ती भाषा निवडू शकतो.
Salzburg हे ऑस्ट्रिया तील ४थ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ALSTADT हे सर्वात जुने historic centre असून UNESCO world heritage site म्हणून १९९६ मध्ये घोषित केले गेले. इथे २७ चर्च आहेत. हे त्याच्या baroque architecture साठी प्रसिद्ध आहे. अत्यंत scenic असे हे शहर alps पर्वतरांगांनी वेढलेले आहे.
हे शहर अजून दोन मुख्य कारणांसाठी जगप्रसिद्ध आहे.. ती म्हणजे.. १८व्या शतकातील composer Wolfgang Amadeus Mozart ह्याचे हे जन्मस्थान आहे.आणि २०व्या शतकातील खूप famous झालेल्या musical फिल्म ‘The Sound Of Music’ ह्याचे चित्रीकरण हि इथेच झाले.
मोझार्ट ने त्याच्या वयाच्या ५व्या वर्षापासून music compose करायला सुरुवात केली. जवळजवळ ६००हुन अधिक उत्तमात्तोम रचना त्याने तयार केल्या! आणि खूप कमी वेळात त्या खूप लोकप्रिय झाल्या! ह्या गुणी कलाकाराच्या दुर्दैवाने वयाच्या ३५व्या वर्षीच त्याचा मृत्यू झाला.. आणि तोही वादग्रस्त ठरला!
तर.. map मधून आम्ही प्रथम जाण्यासाठी निवडले ते Hellbrunn Palace!!
Hellbrunn Palace ला जाताना वाटेत अनेक महत्वाची ठिकाणे दिसली. उंचश्या टेकडीवर fortess Hohensaleburg दिसला. गावातून वाहणारी Salzach नदी, city hall पहिले. अर्ध्या तासात Hellbrunn Palace ला पोचलो. हा palace १६१२-१६१९ मध्ये Archbishop Markus Sittikus ने त्याच्या मनोरंजनासाठी बांधला. Baroque style चे architecture इथे प्रामुख्याने दिसते. इथून वाहणाऱ्या ताज्या झर्याशेजारी त्याला प्रसन्न व शांत वाटायचे. हा त्याचा उन्हाळी निवास होता.
हा palace इथल्या trick fountain साठी tourist मध्ये लोकप्रिय आहे. Markus Sittikus ह्या राजाला उत्तम विनोदबुद्धी होती आणि आलेल्या पाहुण्यांची गम्मत करून त्यांची मजा पहायच्या त्याच्या इच्छेतून त्यांनी ह्या trick fountain ची रचना केली. तेथील guide ने पण तेवढ्याच मिश्किलपणे आमच्यावर ह्या सर्व tricks वापरत त्या परिसराची सफर घडवली.
तो ह्या area तून आम्हाला फिरवत असताना चालता चालता अचानकपणे पाण्याचे फवारे आमच्या अंगावर उडायचे! (म्हणजे तोच ते पूर्वीचे hidden mechanism आमच्या नकळत चालू करून ते पाणी उडवायचा!) आणि मग अचानक झालेल्या ह्या पाण्याच्या मारयानी जी काही पळापळ होऊन लोकांची तारांबळ उडायची न! न भिजलेले लोक भिजलेल्या लोकांकडे पाहून हसायचे तोपर्यंत कुठूनतरी पाणी उडून तेही भिजायचे!!
इथे एक दगडी dining table आहे. त्यातली राजाची seat सोडल्यास guestच्या सर्व seats खाली पाण्याचे pipes आहेत! जेवायला आलेल्या पाहुण्याची अशी गम्मत करायला राजाला आवडायचे!
ह्याशिवाय पाण्यावर operated अनेक छोटे मोठे अविष्कार इथे आहेत. एक पाण्यावर operated music playing mechanical theatre आहे. त्यात २०० छोट्या छोट्या हलत्या प्रतिकृती (बाहुल्या) वेगवेगळे व्यवसायाचे सादरीकरण करतात. २ कासवे समोरासमोर ठेवली आहेत आणि एकाच्या तोंडातून दुसर्याच्या तोंडात पाण्याची धार सोडली आहे पण नक्की कोणत्या कासवाच्या तोंडातून हि धार सोडली आहे ते कळतच नाही! मध्ये हात घालून guide ने दाखवलं तेव्हा कळले.
तर अशी धमाल-मस्तीची tour करून शेवटी राजवाड्यापाशी आलो. संध्याकाळचे 4 वाजले होते. lunch तसा आज झालाच नव्हता. तेव्हा समोरच्याच restaurant मध्ये जाऊन पोटपूजा केली! मग palace ची headphone लावून tour केली आणि परत बस stop वर आलो!
Next stop मोझार्ट residence ला घेतला. इथे मोझार्ट ची family १७७३ पासून रहायची. आता ते एका museum मध्ये रुपांतरीत केले आहे! स्वतः मोझार्ट इथे १७८१ पर्यंत रहात होता. परत रस्त्याने चालत चालत पार्किंग पाशी आलो. आणि Bad Goisernकडे निघालो! ७-७.३० पर्यंत तिथे पोचलो.. खोलीवर येऊन fresh होऊन लगेच dinner ला बाहेर पडलो..गावातच एक छानसे restaurant मिळाले.. इथले जेवण खूपच छान होते. सलाड, sandwitch, jacket potato, wine.. असे निवांत जेवण झाले! परत रमतगमत walk घेत हॉटेल वर परत आलो..





