आजचा आमचा ऑस्ट्रिया तील शेवटचा दिवस! सकाळी ९.१५ ला breakfast करून bags भरून Vienna ला निघालो..खरतर original tour plan प्रमाणे आम्ही direct बुडापेस्ट ला जाणार होतो. पण आम्ही आतापर्यंतच्या प्रवासात वापरत असलेली mercedes हि जिथून hire केली होती त्या travel agency ने सांगितले की हि गाडी luxury category मधली असल्यामुळे बुडापेस्ट ला नेता येणार नाही..आणि नेलीच तर त्याची संपूर्ण जबाबदारी आमची राहील कारण बुडापेस्ट हि इतर European cities एवढी safe city नाहीये! म्हणून vienna ला जाऊन हि गाडी पार्क करून दुसरी साधी गाडी घेऊन पुढे जायचे ठरवले..
Salzburg सोडताना डोळे भरून पाहता यावे म्हणून मी पुढच्या seat वर येऊन बसले. mobile कॅमेरा वर time lapse, videos आणि जमेल तेवढे खूप फोटो काढले.. साधारण २.00 वाजता vienna ला पोचलो. गाडी पार्किंग lot मध्ये पार्क करून दुसर्या गाडीसाठी travel agency चे मेट्रो station मध्ये असलेले office शोधले. दुसर्या गाडीसाठीचे सोपस्कार पार पाडून escalator ने वर आलो. आनंद ला जेवायचे नसल्याने तो जुनी गाडी आधी पार्क केलेल्या lot मधून घेऊन येण्यासाठी गेला. आणि आम्ही जेवायला मेट्रो station मधीलच एक हॉटेल गाठले. fried chicken- noodles असे आमचे lunch होईपर्यंत आनंद आला आणि मग सगळे agency च्या पार्किंग lot मध्ये गेलो. जुन्या गाडीतले आमचे सगळे सामान नवीन पुजो गाडीत पटापट शिफ्ट केले. जुन्या हिंदी picture मधले smugglers इधर का माल उधर! करायचे न त्याचीच आठवण झाली!!
आधी salzberg प्रमाणेच Vienna ना ची हि city tour करणार होतो. पण बुडापेस्ट ला संध्याकाळी उशिरात उशिरा ७ वाजेपर्यंत check-in करावेच लागणार होते. त्यामुळे city tour ला वेळ मिळाला नाही.
Vienna हे ऑस्ट्रिया चे capital असून सर्वात मोठे शहर आहे.. इथून Danube नदी वाहते. हे शहर इथल्या imperial palaces साठी प्रसिद्ध आहे. पण capital city असल्यामुळे इथे बरेच modern architecture हि दिसले!
आम्ही साधारण ३-३० ला बुडापेस्टला निघालो.. वाटेत खूप साऱ्या windmills दिसल्या..बुडापेस्ट बोर्डर जवळ येऊ लागल्यावर vignettes च्या पाट्या दिसू लागल्या. vignette म्हणजे आपण इथे highways ना जसा toll भरतो न तसेच इथला हा रोड चा toll! ह्याचे पैसे भरून जी पावती मिळते ती आपल्या गाडीच्या windscreen वर लावायची असते!
इथे आम्हाला ऑस्ट्रिया आणि Czech Republic(बुडापेस्ट) ला हे vignette घ्यावे लागले.
तर vignette घेतले आणि पुढे निघालो. जसजसे बुडापेस्ट जवळ येऊ लागले तसतसे ते ऑस्ट्रिया चे अदभूत निसर्गसौंदर्य कमीकमी होऊन काहीसा रुक्ष प्रदेश चालू झाला!!
मग मात्र मी डोळे बंद करून ऑस्ट्रियात घालवलेल्या त्या मागच्या २ सुंदर दिवसाची उजळणी परत परत करत राहिले!!






