खूप सुंदर आणि प्रसन्न सकाळ! वातावरणात एक आल्हाददायक गारवा आहे!(पाऊस पडल्यावर येतो ना तसा) हॉटेल समोरून वाहणाऱ्या एका छोट्या झर्याचा मोठा खळखळाट! किलबीलणारे पक्षी! ह्या एवढ्या fresh हवेत लवकर उठून morning walk ला जायचा आनंद कसा चुकवणार? DSLR आणि mobile सज्ज करून ७.00 वाजता रुमच्या बाहेर पडलो. समोरची बाग ओलांडून मुख्य रस्त्यावर आलो. स्वच्छं रस्ते आणि आखीवरेखीव असे गाव! गावातल्या मुख्य चौकात पोहोचलो तेव्हा तिथे छोटे भाजी market दिसले. (आपल्या इथली मंडई असते तशी! पण छोटी, आटोपशीर आणि तुरळक गर्दीची..)
इथे अनेक stalls दिसले. flower, कोबी, tomato, ब्रोकोली अश्या ताज्या भाज्या होत्या तर fresh Blueberry, strawberry, apples, केळी, dryfruits हि होती! food truck सारख्या गाडीमध्ये cold storage चे food items म्हणजेच अनेक प्रकारचे फिश, meat, sausages होते. रंगीबेरंगी अंडी, breads होते.
इथे बागकामाची , फुलझाडांची हौस हि फक्त summer चे ३-४ महिनेच करता येते. त्यामुळे अनेक छोट्या छोट्या कुंड्यात फुल-झाडे, succulents हि मोठ्या प्रमाणावर विकायला होती..पुढे चालत गेल्यावर एका चर्च च्या बाजूलाच गुलाबी फुलांनी लगडलेले सुंदर cherry blossomचे झाड दिसले!
या गावात अजून एक वेगळीच कला प्रथमच पहिली ती म्हणजे एक मोठे झाड घराच्या भिंतीलगत वेलीप्रमाणे जमिनीपासून अगदी २ मजली छतापर्यंत वाढवत न्यायचे. झाडाच्या फांद्या घराच्या खिडक्यांच्या आजुबाजुनी वाढू द्यायच्या. आणि हे फक्त २-dimensional plane मध्ये! इतके भारी दिसत होते!! ह्याला ‘Espalier’ असे म्हणतात. जसे बोन्साई मध्ये झाडे एका विशिष्ठ पद्धतीने वाढवतात तशीच ह्या पद्धतीत फांद्यांचे prooning करून झाड २ dimensional plane मध्ये वाढवतात. apple, pear अशी फळझाडे व अनेक फुलझाडे अशा पद्धतीने घराच्या stone finish किंवा contrast colour च्या भिंतीच्या background वर इतकी सुंदर दिसतात.
ऑस्ट्रिया हा इतका सुंदर देश आहे आणि ह्याचे सौंदर्य जपण्याचाच नाही तर ते वृद्धींगत करण्याचा प्रयत्न इथला प्रत्येकजण करतो!
तर असा तासाभराचा फेरफटका मारून हॉटेल वर परत आलो.
तासाभरानी हॉटेल वर परत आलो तेव्हा भूक लागल्यामुळे direct breakfast करायला गेलो. breakfast hall छोटेखानी पण सुंदर सजवला होता. host ची serving ची लगबग चालली होती. breakfast चा spread खूप छान होता. आज प्रथमच एवढ्या दिवसात scrambled egg..ऑम्लेट चा option होता. Dryfruits, fresh fruits, cereals, muffins, वेगवेगळ्याप्रकारचे breads, flavoured cheese, flavoured yogurt, salads, fresh fruit juice असा अगदी शाही breakfast होता!!
आणि मुख्य म्हणजे अतिशय अप्रतिम coffee होती! अख्या ट्रिपमधली best coffee मी इथे प्यायले!
europe च्या coffee culture मध्ये coffee हि फार गरम serve करत नाहीत. थोडीशी कोमट असते…पण आपल्याला अगदी गरमागरम चहा किंवा coffee ची सवय असते. त्यामुळे बहुतेक वेळेला आम्ही extra hot coffee मागायचो. आणि ते लोक आमच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघायचे. are you sure? असे विचारून हसून मग ती coffee microwave करून आणून द्यायचे!
आज salzburg city tour करायची होती पण त्याआधी एक मोठा programme होता! तो म्हणजे साडीतल्या फोटोचा! एवढ्या सुंदर निसर्गसौन्दार्यात बर्फाच्या backgroundवर साडी नेसून फोटो काढायचेच हा आमच्या ‘wishlist’ मधला एक नंबरचा item होता! त्यासाठी साड्यांची- blouse ची जुळवाजुळव करण्यापासून ते आपापल्या नवर्यांना आमचे फोटो काढण्यासाठी पटवेपर्यंत जय्यत तयारी केली होती! ह्या सर्व (उद्योगासाठी!) आम्हाला ४५ मिनिटाचा वेळ (मंजूर!) करण्यात आला होता!
वेळेचा पुरेपूर उपयोग करत जवळच्याच बागेत (हे location आम्ही सकाळीच morning walk ला जाताना हेरून ठेवले होते!) मनसोक्त fashion photography अखेर पार पडली! आमचा हा सर्व (विनोदी!) प्रकार बघून आजूबाजूची लोक आम्हाला हसत असतील असेही एकदा वाटले! पण त्यातीलच एक म्हातारे Austrian couple जेव्हा आमच्या जवळ आले आणि भाषा समजत नसल्यामुळे हातवारे करून सांगू लागले की त्यांना आमच्या बरोबर फोटो काढायचा आहे तेव्हा आपल्या इंडिया तील साडी आणि कुंकू ह्याची तिकडे अजून असलेली नवलाई जाणवली!! आणि ह्या पेहेराव बद्दलचा अभिमान हि वाटला!
मग पटापट कपडे बदलून पुढे निघालो ते जवळच असलेल्या sommerrodelbahn ला! हि एक adventure ride आहे. जवळजवळ आपल्या पर्वतीच्या उंची एवढ्या टेकडीवरून जमिनीलगत असलेल्या वळणावळणाच्या track वरून आपण घसरत खाली येतो! आणि खाली येताना समोर दिसत असते अप्रतिम निसर्गसौंदर्य! एखाद्या rollercoaster प्रमाणेच असते हि ride!ह्याच track वरून आपल्याला उलटे खेचून वर पर्वताच्या टोकावर घेऊन जातात! उलटे ह्यासाठी की आपण खाली असलेले lake समोरचे पर्वत ह्याचा आनंद घेत जावे! पहिली ride घाबरतच केली पण मग दुसरी करताना मस्त video shooting पण केले.
ह्यानंतर निघालो ते Salzburg city कडे! पावलोपावलीचे सृष्टीसौंदर्य डोळ्यांना तर गाडीतल्या speakers वर लावलेले लताबाई आणि किशोरकुमार चे सूर कानांना तृप्त करत होते!
युरोप मध्ये अनेक highways वर speed limit च्या पाट्या असतात आणि त्याप्रमाणेच कारचा speed ठेवणे अपेक्षित असते! ते मोडल्यास driver ला लगेच ticket मिळते! म्हणजेच दंड होतो. जागोजागी हे speed limit तपासायला कॅमेरे बसवलेले असतात. Austria त तर अगदी झाडाझुडूपात लपवलेले पण कॅमेरे आहेत!
तर साधारण तासाभरात Salzburg आले तेव्हा दुपारचा १ वाजला होता! तर salzberg बद्दल उद्याच्या post मध्ये!











