ओरोवील – एक आगळेवेगळे जग

तुम्हाला अस गाव माहिती आहे का जिथे वेगवेगळ्या जातीची, धर्माची, पंथाची एवढच नाही तर नागरिकत्वाची लोक गुण्यागोविन्दानी एकत्र राहतात. इथे लोक व्यवसाय, नोकरी हे त्यांचा बँक balance वाढवण्यासाठी करत नाहीत तर त्यांच्या अगदी मुलभूत गरजा भागवण्यासाठी करतात… इथे सर्वाना समान वेतन मिळते.. अगदी डॉक्टर पासून बेकरीत काम करणाऱ्या माणसापर्यंत! त्यामुळेच एखाद्या शर्यतीत धावल्याप्रमाणे आयुष्य न जगता शांत, सुखी आणि महत्वाचे म्हणजे समाधानी आयुष्य इथे लोक जगतात. इथे कुठलीच मूर्तीपूजा होत नाही फक्त आत्मिक शांतीसाठी ध्यानधारणा होते..

इथली हवा प्रदूषणमुक्त आहे..इथे लोक सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला खातात.. इथले नागरिक रोजच्या जीवनात रोखीचे आर्थिक व्यवहार करतच नाहीत!

असे हे एवढे अनोख्या जीवनशैलीचे गाव आहे तरी कुठे? माहितीये का तुम्हाला?

तर हो.. अस गाव खरच आहे..अगदी आपल्या भारतातच आहे! चेन्नईपासून 160 किमी अंतरावर.. त्याच नाव आहे ओरोवील!!

मग काय ह्या इतक्या नाविन्यपूर्ण संकल्पनेवर वसलेल्या गावाला भेट द्यायची उर्मी काही स्वस्थ बसू देईना!!

डिसेंबर, जानेवारी हा इथे यायचा चांगला ऋतू आहे.. कारण उन्हाचा तडाखा कमी असतो..आणि हवाही कोरडी असते..तर असाच एक weekend पकडून आम्ही pondicherry गाठले! pondicherry हे चेन्नई पासून १५० किमी वर आहे. आणि ओरोवील हे pondicherry पासून १६ किमी वर आहे..बस रिक्षा किंवा कॅब ने पोंडी पासून ओरोवीलला सहज जाता येते.

ओरोवील हे काही खरतर ‘typical tourist spot’ नाहीये…पण इथे बघण्यासारख्या..अनुभवण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.. त्यातल्या त्यात सर्वांनी नक्की पाहाव्या अशा गोष्टी म्हणजे..

  • मातृमंदिर
  • स्वरम musical instruments factory
  • ओरो बीच
  • फ्रेंच पदार्थ मिळणाऱ्या बेकरीज आणि कफेज
  • अभिनव वास्तुकलेचा अविष्कार असणाऱ्या वेगवेगळ्या इमारती

ह्या व्यतिरिक्त इथे अनेक उपक्रम, कार्यशाळा वर्षभर चालू असतात.जे ७ दिवसांपासून अगदी २-3 महिन्यांचे  असतात. ह्यात योग, कला, हस्तकला, शिल्पकला, pottery ई. शिकवतात.

तर pondicherry तल्या प्रसिद्ध rock beach जवळच आम्ही  हॉटेल घेतले. कारण पहाटे उठून समुद्रातून होणारा सूर्योदय आम्हाला चुकवायचा नव्हता. भारताच्या पश्चिम किनारपट्टी जवळ राहत असल्यामुळे नेहमी समुद्रात सूर्यास्तच पाहत आले आहे..त्यामुळे आता त्या अथांग समुद्रातून केशरी गुलाबी रंगांची उधळण करत भारदस्त आगमन करणारा सूर्यदेव पाहायला आम्ही खूप उत्सुक होतो!! सुर्योदायची वेळ बघून गजर लावून पहाटेच उठलो..कॅमेरे सरसावून beach च्या दिशेने निघालो.. अंधारात आकाशात थोडे ढग दिसले..आणि मनात पाल चुकचुकली!! beach वर पोचलो तर आमच्या सारखीच अनेक लोक आली होती. दूरवरून परत येणारी मासेमारीला गेलेली जहाजे दिसत होती. काल रात्री सुटलेला बेभान वारा आता शांत झाला होता..समुद्राच्या लाटा संथ लयीत एकामागून एक किनार्याच्या भोज्याला शिवून जात होत्या.. आमचे डोळे मात्र क्षितीजावर दाटून आलेल्या ढगांच्या मागे पसरलेल्या अस्पष्ट लाली वर खिळले होते..मनोमन वाटत होते की आत्ता हे ढग विरावेत आणि सूर्योदय दिसावा!!! पण कसचा काय..आधी भुरूभुरू आणि मग जोरात असा पाऊस सुरु झाला..खूप धावपळ करत आडोसा गाठला.. better luck  next time  असा स्वतःला समजावत खट्टू मनानी परत निघालो..

हॉटेल वर येऊन आवरून सकाळी 9 वाजता ओरोवील च्या दिशेने गाडीने निघालो. आता पाऊस थांबला होता.आणि ऊन पडले होते. pondicherry हे इथल्या फ्रेंच वसाहती साठी प्रसिध्ध असल्यामुळे वाटेत खूप सुंदर फ्रेंच धाटणीची घरे पाहायला मिळाली. साधारण १५-20 मिनिटात ओरोवील ला पोचलो.मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूला वळल्यावर लगेचच दोन्ही बाजूला जंगल सदृश झाडांची गर्दी दिसू लागली. पहिलाच मुक्काम ‘Bread & Chocolate’ ह्या फ्रेंच बेकरी पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या café त केला.इथे ताजे bake केलेले आणि अतिशय चविष्ट ब्रेड केक, healthy ब्रेकफास्ट bowls, croissant खूप छान मिळतात. खवय्ये लोकांसाठी इथे थांबणे म्हणजे पर्वणीच आहे.

पोटपूजा केल्यानंतर निघालो मातृमंदिर च्या दिशेनी..एका मोठ्या पार्किंगच्या जागेत गाडी पार्क करून चालत पोचलो ते visitors centre मध्ये! पोंगल चा सण असल्यामुळे बरीच गर्दी होती.झाडांच्या गर्दीत असलेले हे centre उघड्या वीटकामात पर्यावरणपूरक साहित्य वापरून बांधलेले आहे.तिथे डाव्या बाजूला shopping centre आणि कॅन्टीनस आहेत तर उजव्या बाजूला मोठा प्रदर्शनाचा hall आहे.तिथे ओरोवील बद्दलची माहिती व photos आहेत. मातृमंदीरची प्रतिकृती ठेवली आहे. दोन अजून hall आहेत तिथे १० मिनिटाच्या दृकश्राव्य फिती दाखवल्या जातात.ज्यात श्री अरबिंदो यांचा आणि ओरोवील बद्दलचा इतिहास थोडक्यात सांगितला जातो.

आम्ही दोन्ही चित्रफिती बघितल्या. ओरोवील चा इतिहास खरच रंजक आहे. ओरोवील हि एक experimental,universal township आहे. तामिळनाडू राज्यातील विलुपुरम ह्या जिल्ह्यात याचा काही भाग येतो तर काही भाग हा union territory of pondichery त येतो. ह्याची स्थापना १९६७ साली मीरा अल्फासा (popularly called “the mother’)यांनी केली. मीरा ह्या श्री अरबिंदो ह्यांच्या शिष्या होत्या. अरबिंदो हे क्रांतिकारक, द्रष्टे, तत्वन्यानी होते. त्यांना जातीधर्मा पलीकडचा आणि मानवतावादी दृष्टिकोनावर अवलंबून असा समाज निर्माण करायची इच्छा होती. त्यांच्या ह्याच संकल्पनेस पुढे नेत त्यांच्या नंतर मीरा यांनी ह्या township ची स्थापना केली. Roger Anger ह्या फ्रेंच architect नी ह्याला साकारले. ह्याला थोड्या प्रमाणात भारत सरकार व unesco चीही आर्थिक मदत मिळाली आहे. इथे वेगवेगळ्या ५२ देशाची जवळजवळ २५०० लोक राहतात. भारतीयान खालोखाल फ्रेंच जर्मन इटलीयन लोक इथे आहेत. 20 sq.kms. जागेत हे वसलेले आहे. ५० वर्षांपूर्वी अतिशय पडीक आणि रुक्ष असलेल्या अशा ह्या जमिनीचे आज जंगल वाटेल अश्या वनश्रीत रुपांतर झाले आहे. येथील नागरिकत्व हवे असल्यास एका १५ महिन्याच्या प्रवेश प्रक्रीयेतून जावे लागते. तरच आपण guest वरून newcomer आणि मग aurovillian बनू शकतो.

ह्या अभिनव प्रायोगिक तत्वावर वसलेल्या शहराला वास्तुकलेसाठी..renewable energy साठी..स्थापत्य कलेसाठी.. अनेक देशी विदेशी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

मातृमंदिर बघण्याआधी हि सर्व माहिती घेतल्यामुळे ह्या जागेकडे बघायचा एक वेगळाच दृष्टीकोन मिळाला. मातृमंदिर आतून किंवा बाहेरून कसेही बघायचे असले तरी त्यासाठी पास घ्यावे लागतात. जे की मोफत आहेत. फक्त आतून बघण्यासाठी १-२ दिवस आधी येऊन पास घ्यावे लागतात. आमच्या कडे तेवढा वेळ नसल्यामुळे आम्ही बाहेरूनच बघायचे ठरवले. मातृमंदिर बाहेरून पाहण्यासाठी एक viewing point केला आहे. तिथे चालतच जावे लागते. दोन्ही बाजूला झाडी..मधूनच एखादे कलात्मक शिल्प…वेलींचे बनवलेले बोगदे.. असा साधारण १.५ किमी चा मातीचा रस्ता चालून गेल्यावर आपण पोहचतो एका भव्य वटवृक्षा पाशी! ५० मी. इतका मोठा व्यास असलेल्या ह्या वृक्षाला अनेक पारंब्या आहेत..ज्या की स्वतःच एकएक वृक्ष आहेत..आश्चर्याची गोष्ट म्हणजे 45 वर्षांपूर्वी जेव्हा ओरोविल् चे बांधकाम सुरु झाले तेव्हा या इतक्या मोठ्या पडीक जमिनीवर हा एकमेव वृक्ष उभा होता…आणि हाच वृक्ष आता ओरोवील चा भौमितिक मध्य आहे..सर्व शहर एका आकाशगंगेच्या संकल्पनेवर ह्याच्या भोवती वसले आहे.

इथून थोडेच पुढे गेल्यावर viewing point पाशी पोचलो..आणि समोर दिसला तो एक मोठा सोनेरी लखलखणारा गोळा..12 पाकळ्यांवर हलकेच विराजमान झालेला.. सोनेरी रंगाच्या छोट्या छोट्या चकत्यांनी बनलेला..आजूबाजूला हिरवाईने नटलेली बाग..आणि लांबवर एक amphitheatre..पाहूनच मन प्रसन्न आणि शांत झाले. आणि उमगले मुद्दाम चिंतन करण्यासाठी इथे लोक का येत असतील.. इथे आत कोणतीही मूर्ती नाहीये..गोलाच्या मध्यभागी फक्त एक काचेचा गोळा आहे.. ज्यांना खरोखरीच मनापसून चिंतन करायचे आहे त्यांनी मन इथे एकाग्र करून आत्मचिंतन करणे अपेक्षित आहे..आणि तशी वातावरण निर्मितीही इथे केली आहे.त्यामुळेच नुसते बघायला येणाऱ्या पाहुण्यांपासून ध्यानाला बसलेल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून ठराविक वेळा आणि पास याचे बंधन आहे. एवढी सुंदर कलाकृती आतून बघायची राहून गेली म्हणून थोडी हळहळ वाटली..

आता परत निघालो visitors centre च्या दिशेनी..थंडीचे दिवस असूनही उन चांगलेच तापले होते.. त्यावरून उन्हाळ्यात इथे किती गरम होत असेल ह्याची कल्पना आली..भूक लागल्यामुळे कॅन्टीन मध्ये जाऊन जेवणाची थाळी घेतली. जी बरीच वाजवी दरात होती..अनेक परदेशी लोकही ही थाळीच खात होते..

शेजारच्याच shopping centre मध्ये फेरी मारली. कपडे..दागिने..सुवासिक गोष्टी..पुस्तके..अशा अनेक  छान गोष्टी होत्या पण खूप महाग होत्या..

आता निघालो स्वरम ह्या musical instruments च्या factory कडे..ओरोवील च्या आत सगळीकडेच मातीचे कच्चे रस्ते आहेत..गाडीचे GPS चालू केले..आणि google काकू सांगतील तशी कधी डावीकडे तर कधी उजवीकडे अशी वळणे घेत खूप वेळानी अडनिड्या रस्त्यानी एकदाचे पोचलो!!

स्वरम हि एक आगळीवेगळी वाद्यांची निर्मिती आणि संशोधन करणारी संस्था आहे. येथे जगभरातले अनेक वादक एकत्र मिळून वाद्यांची आणि वादनाची एक वेगळीच परिभाषा शोधत आहेत. येथे वाद्य तयार करण्यासाठी निरनिराळ्या साहित्याचा वापर केला जातो. येथे वाद्यांचा उपयोग हा नादनिर्मिती बरोबरच उपचारासाठीही केला जातो. Aurelio हे ह्याचे संस्थापक आहेत त्यांना ३० वर्षाहून जास्त असा त्यांचा ह्यातील अनुभव आहे. त्यांच्या मते नाद हा फक्त कानांनी ऐकायचा नसून मनानी..आत्म्यानी.. अनुभवायचा असतो.. येथे नादनिर्मिती करणारी अनेक अनोखी वाद्य पाहिली. एक मोठा granite दगड एका विशिष्ठ पद्धतीने कापून ठेवला आहे.. आणि त्यावर आपले हात पाण्याने ओले करून जेव्हा फिरवतो तेव्हा सुंदर सुरावट ऐकायला येते. एका गोल डफली सारख्या डब्यात वाळू भरली आहे आणि ती डफली हळू हळू तिरकी केली की समुद्राच्या लाटांचा आवाज येतो. एका मोठ्या घंटेमध्ये अडकवलेल्या spring ला पीळ देवून हलकेच सोडले की हुबेहूब वादळ घोंगावत येत असल्याचा आवाज येतो..कवड्या किंवा शिंपल्याच्या  माळांना हलवले असता त्यातून निघणारा आवाज हा अक्षरशः पाण्याच्या धबधब्यासारखा येतो..हे सगळे खूप अदभूत आहे..ह्या नादलहारींमागे शास्त्र आहे.. आणि ह्याचाच वापर करून इथे sound healing म्हणजेच उपचारही केले जातात. हे नक्कीच अनुभवण्यासारखे आहे. Sound healing treatment घेण्यासाठी आधी वेळ निश्चित करावी लागते.

येथे ह्या सर्व वाद्यांची विक्रीही होते. समोरच वाद्यांची एक बागही आहे. हि मात्र सशुल्क आहे. येथे शास्त्रीय पद्धतीवर आधारित वाद्यांची खेळणी आहेत.

ह्या आवाजाच्या अनोख्या दुनियेत आम्ही खूप वेळ रमलो.. आणि मग परतीच्या वाटेला निघालो. येथे सर्वच दुकाने हॉटेल्स हि लवकर म्हणजे अगदी ५ वाजताच बंद होतात. खूप दाट झाडी असल्यामुळे अंधार हि लवकर पडतो. जाताना परत bread and chocolate हे सकाळचे कॅफे लागले.. सकाळी खालेल्या croissant ची चव अजून जिभेवर रेंगाळत होती..आपसूक गाडी तिथे थांबली..आत जाऊन पहिले तर सर्व पदार्थ संपले होते..शेवटचा cinnamon रोल राहिला होता..तो लगेच घेतला.. आणि तिथेच भेट झाली एका फ्रेंच तरुणाची.. तो ह्या कॅफेचा ५ partner पैकी एक पार्टनर होता. त्याच्याशी गप्पा मारून ओरोवील बद्दल खूप गोष्टी कळल्या. तो म्हणाला ओरोवील च्या नियमाप्रमाणेच तो व त्याच्या सर्व parteners ना २०००० रु. महिना पगार मिळतो. हे कॅफे जास्त नफा कमावण्यासाठी ते चालवत नाहीत. दररोजचे ठरवलेल्या प्रमाणाचेच पदार्थ ते बनवतात. जास्त विकले जातायत म्हणून अजून बनवा..अजून  शाखा काढा ..अजून पैसा कमवा.. हे त्यांना मान्य नाही.. छान वाटले ऐकून.. पैशाच्या मागे धावणाऱ्या ह्या युगात हे विचार खूप आवडले. हे सर्व जण वेगवेगळ्या देशातून इथे ओरोवील मध्ये येऊन राहत आहेत.

खरतर इतके काही वेगळे आज दिवसभरात पहायला.. अनुभवायला मिळाले होते.. तरी खूप काही बघायचे राहिले होते..पण वेळेच्या बंधनामुळे आता ओरोवील ची रजा घ्यायला लागत होती..पण परत लवकरच यायचे हे ठरवून आम्ही परत pondicherry च्या दिशेनी निघालो.

फ्रेंच संस्कृती चा छाप असलेले पोंडीचेरी पण खूप छान आहे..त्याविषयी पुढच्या blog मध्ये..

famous cafe in auroville.. bread and chocolate..a must visit place..
healthy breakfast bowl in ‘bread and chocolate’
हाच तो ५० वर्षाहूनही जास्त जुना वटवृक्ष..
मातृमंदिर..

भाग-६- vienna

आजचा आमचा ऑस्ट्रिया तील शेवटचा दिवस! सकाळी ९.१५ ला breakfast करून bags भरून Vienna ला निघालो..खरतर original tour plan प्रमाणे आम्ही direct बुडापेस्ट ला जाणार होतो. पण आम्ही आतापर्यंतच्या प्रवासात वापरत असलेली mercedes हि जिथून hire केली होती त्या travel agency ने सांगितले की हि गाडी luxury category मधली असल्यामुळे बुडापेस्ट ला नेता येणार नाही..आणि नेलीच तर त्याची संपूर्ण जबाबदारी आमची राहील कारण बुडापेस्ट हि इतर European cities एवढी safe city नाहीये! म्हणून vienna ला जाऊन हि गाडी पार्क करून दुसरी साधी गाडी घेऊन पुढे जायचे ठरवले..

Salzburg सोडताना डोळे भरून पाहता यावे म्हणून मी पुढच्या seat वर येऊन बसले. mobile कॅमेरा वर time lapse, videos आणि जमेल तेवढे खूप फोटो काढले.. साधारण २.00 वाजता vienna ला पोचलो. गाडी पार्किंग lot मध्ये पार्क करून दुसर्या गाडीसाठी travel agency चे मेट्रो station मध्ये असलेले office शोधले. दुसर्या गाडीसाठीचे सोपस्कार पार पाडून escalator ने वर आलो. आनंद ला जेवायचे नसल्याने तो जुनी गाडी आधी पार्क केलेल्या lot मधून घेऊन येण्यासाठी गेला. आणि आम्ही जेवायला मेट्रो station मधीलच एक हॉटेल गाठले. fried chicken- noodles असे आमचे lunch होईपर्यंत आनंद आला आणि मग सगळे agency च्या पार्किंग lot मध्ये गेलो. जुन्या गाडीतले आमचे सगळे सामान नवीन पुजो गाडीत पटापट शिफ्ट केले. जुन्या हिंदी picture मधले smugglers इधर का माल उधर! करायचे न त्याचीच आठवण झाली!!

आधी salzberg प्रमाणेच Vienna ना ची हि city tour करणार होतो. पण बुडापेस्ट ला संध्याकाळी उशिरात उशिरा ७ वाजेपर्यंत check-in करावेच लागणार होते. त्यामुळे city tour ला वेळ मिळाला नाही.

Vienna हे ऑस्ट्रिया चे capital असून सर्वात मोठे शहर आहे.. इथून Danube नदी वाहते. हे शहर इथल्या imperial palaces साठी प्रसिद्ध आहे. पण capital city असल्यामुळे इथे बरेच modern architecture हि दिसले!

आम्ही  साधारण ३-३० ला बुडापेस्टला निघालो.. वाटेत खूप साऱ्या windmills दिसल्या..बुडापेस्ट बोर्डर जवळ येऊ लागल्यावर vignettes च्या पाट्या दिसू लागल्या. vignette म्हणजे आपण इथे highways ना जसा toll भरतो न तसेच इथला हा रोड चा toll! ह्याचे पैसे भरून जी पावती मिळते ती आपल्या गाडीच्या windscreen वर लावायची असते!

इथे आम्हाला ऑस्ट्रिया आणि Czech Republic(बुडापेस्ट) ला हे vignette घ्यावे लागले.

तर vignette घेतले आणि पुढे निघालो. जसजसे बुडापेस्ट जवळ येऊ लागले तसतसे ते ऑस्ट्रिया चे अदभूत निसर्गसौंदर्य कमीकमी होऊन काहीसा रुक्ष प्रदेश चालू झाला!!

मग मात्र मी डोळे बंद करून ऑस्ट्रियात घालवलेल्या त्या मागच्या २ सुंदर दिवसाची उजळणी परत परत करत राहिले!!

on the way to Vienna..
typical austrian landscape..
अशी पिवळी मोहरीची शेतं खूप ठिकाणी दिसली…
the moment when car speed touched 2oo!!!!
our black beauty!!!
a picturesque spot where we collected vignette for austria..couldn’t resist posing..

भाग-५-Salzberg city Tour

तर दुपारी एक वाजता Bad Goisern हून salzberg ला पोचलो.पार्किंग lot मध्ये कार पार्क करून hop on hop off च्या बस stop वर गेलो. बसच्या तिकीटाबरोबरच त्याच्या stops चा एक map मिळाला. हातात असलेल्या वेळावरून बघायची ठिकाणे निश्चित केली.

कुठल्याही नवीन शहरात आपापले फिरण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. ह्या बसेस त्यांच्या ठराविक मार्गांवरून सतत फिरत असतात आणि त्या मार्गावरील ठरलेल्या प्रेक्षणीय स्थळाच्या stop पाशी आपल्याला उतरवतात किंवा घेतात. प्रत्येक seat ला headphone दिलेला असतो! त्यात आजूबाजूला दिसणाऱ्या परिसराची commentry चालू असते! त्यामुळे बस मध्ये बसल्याजागी त्या city ची खूप माहिती मिळते. त्यात अनेक भाषांचा पर्याय असतो. आपण आपल्याला हवी ती भाषा निवडू शकतो.

Salzburg हे ऑस्ट्रिया तील ४थ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ALSTADT हे सर्वात जुने historic centre असून UNESCO world heritage site म्हणून १९९६ मध्ये घोषित केले गेले. इथे २७ चर्च आहेत. हे त्याच्या baroque architecture साठी प्रसिद्ध आहे. अत्यंत scenic असे हे शहर alps पर्वतरांगांनी वेढलेले आहे.

हे शहर अजून दोन मुख्य कारणांसाठी जगप्रसिद्ध आहे.. ती म्हणजे.. १८व्या शतकातील composer Wolfgang Amadeus Mozart  ह्याचे हे जन्मस्थान आहे.आणि २०व्या शतकातील खूप famous झालेल्या musical  फिल्म ‘The Sound Of Music’ ह्याचे चित्रीकरण हि इथेच झाले.

मोझार्ट ने त्याच्या वयाच्या ५व्या वर्षापासून music compose करायला सुरुवात केली. जवळजवळ ६००हुन अधिक उत्तमात्तोम रचना त्याने तयार केल्या! आणि खूप कमी वेळात त्या खूप लोकप्रिय झाल्या! ह्या गुणी कलाकाराच्या दुर्दैवाने वयाच्या ३५व्या वर्षीच त्याचा मृत्यू झाला.. आणि तोही वादग्रस्त ठरला!

तर.. map मधून आम्ही प्रथम जाण्यासाठी निवडले ते Hellbrunn Palace!!

Hellbrunn Palace ला जाताना वाटेत अनेक महत्वाची ठिकाणे दिसली. उंचश्या टेकडीवर fortess Hohensaleburg दिसला. गावातून वाहणारी Salzach नदी, city hall पहिले. अर्ध्या तासात Hellbrunn Palace ला पोचलो. हा palace १६१२-१६१९ मध्ये Archbishop Markus Sittikus ने त्याच्या मनोरंजनासाठी बांधला. Baroque style चे architecture इथे प्रामुख्याने दिसते. इथून वाहणाऱ्या ताज्या झर्याशेजारी त्याला प्रसन्न व शांत वाटायचे. हा त्याचा उन्हाळी निवास होता.

हा palace इथल्या trick fountain साठी tourist मध्ये लोकप्रिय आहे. Markus Sittikus ह्या राजाला उत्तम विनोदबुद्धी होती आणि आलेल्या पाहुण्यांची गम्मत करून त्यांची मजा पहायच्या त्याच्या इच्छेतून त्यांनी ह्या trick fountain ची रचना केली. तेथील guide ने पण तेवढ्याच मिश्किलपणे आमच्यावर ह्या सर्व tricks वापरत त्या परिसराची सफर घडवली.

तो ह्या area तून आम्हाला फिरवत असताना चालता चालता अचानकपणे पाण्याचे फवारे आमच्या अंगावर उडायचे! (म्हणजे तोच ते पूर्वीचे hidden mechanism आमच्या नकळत चालू करून ते पाणी उडवायचा!) आणि मग अचानक झालेल्या ह्या पाण्याच्या मारयानी जी काही पळापळ होऊन लोकांची तारांबळ उडायची न! न भिजलेले लोक भिजलेल्या लोकांकडे पाहून हसायचे तोपर्यंत कुठूनतरी पाणी उडून तेही भिजायचे!!

इथे एक दगडी dining table आहे. त्यातली राजाची seat सोडल्यास guestच्या सर्व seats खाली पाण्याचे pipes आहेत! जेवायला आलेल्या पाहुण्याची अशी गम्मत करायला राजाला आवडायचे!

ह्याशिवाय पाण्यावर operated अनेक छोटे मोठे अविष्कार इथे आहेत. एक पाण्यावर operated music playing mechanical theatre आहे. त्यात २०० छोट्या छोट्या हलत्या प्रतिकृती (बाहुल्या) वेगवेगळे व्यवसायाचे सादरीकरण करतात. २ कासवे समोरासमोर ठेवली आहेत आणि एकाच्या तोंडातून दुसर्याच्या तोंडात पाण्याची धार सोडली आहे पण नक्की कोणत्या कासवाच्या तोंडातून हि धार सोडली आहे ते कळतच नाही! मध्ये हात घालून guide ने दाखवलं तेव्हा कळले.

तर अशी धमाल-मस्तीची  tour करून शेवटी राजवाड्यापाशी आलो. संध्याकाळचे 4 वाजले होते. lunch तसा आज झालाच नव्हता. तेव्हा समोरच्याच restaurant मध्ये जाऊन पोटपूजा केली! मग palace ची  headphone लावून tour केली आणि परत बस stop वर आलो!

Next stop मोझार्ट residence ला घेतला. इथे मोझार्ट ची family १७७३ पासून रहायची. आता ते एका museum मध्ये रुपांतरीत केले आहे! स्वतः मोझार्ट इथे १७८१ पर्यंत रहात होता. परत रस्त्याने चालत  चालत पार्किंग पाशी आलो. आणि Bad Goisernकडे निघालो! ७-७.३० पर्यंत तिथे पोचलो.. खोलीवर येऊन fresh होऊन लगेच dinner ला बाहेर पडलो..गावातच एक छानसे restaurant मिळाले.. इथले जेवण खूपच छान होते. सलाड, sandwitch, jacket potato, wine.. असे निवांत जेवण झाले! परत रमतगमत walk घेत हॉटेल वर परत आलो..

hop on hop off bus..
in hop on hop off..deciding on places to visit..
guest ना भिजवणारे हेच ते दगडी dining table..आणि आमचा guide..
trick fountain..unexpected water sprays on walkways…
Mozart Residence..

भाग २- Swarovski Crystal World, Inssbruck

जगभरात अनेक stores असलेल्या ह्या Swarovski crystals चे head quarter आहे ऑस्ट्रियातील wattens ह्या गावात! हे त्याच्या प्रामुख्याने crystal jwellery साठी प्रसिद्ध आहे. पण हे telescopes, binoculars, grinding sawing tools वै. पण बनवतात हे थोड्या लोकांना माहिती आहे.

१८९५ मध्ये  Daniel Swarovski ने हि कंपनी सुरु केली.. swarovski ची अशी इच्छा होती की सर्वसामान्य माणसांना परवडणारे diamond चे दागिने ‘a diamond for everyone’ असे बनवावे. तेव्हा त्याने lead glass पासून बनवलेले (म्हणजेच खरतर काचेचे) पण अतिशय superfine असे पैलू पाडण्याच्या त्याच्या technology मुळे अगदी हुबेहूब हिर्यासारखे दिसणारे crystal चे दागिने बनवले. आणि अल्पावधीच ते खूप लोकप्रिय झाले. आणि मग १९९५ मध्ये हे ‘swarovski crystal worlds (Swarovski kristallwelten)’ हे museum  ह्या कंपनी चा  १०० वा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने खास wattens मध्ये बांधले.

हॉटेल पासून निघाल्यावर १० मिनिटातच लांबून swarovski लिहिलेली मोठी अक्षरे दिसली.. आत जाऊन tickets घेतली. इथे tickets बरोबरच प्रत्येक वेळी त्या area चा एक map देतात. त्यामुळे आपल्याला इथे काय काय पाहायचे आहे ते आधीच कळते. आत गेल्यावर आमचे स्वागत केले ते खूप सुंदर ‘the giant’ ह्या entrance ने!

हिरवळीने आच्छादन केलेल्या  एका टेकडीसारख्या domeच्या सुरुवातीलाच एक मोठा चेहरा बनवला आहे..त्याच्या तोंडातून पाणी खालच्या pond मध्ये पडते! हा एक famous photostop आहे. मस्त गार वारे सुटले होते. इथे photos काढून आत गेलो ते ‘’chamber of wonders’ मध्ये!

ह्या हिरव्या टेकडीच्या खाली एकूण १६ दालने आहेत. त्यालाच म्हणतात ‘’chamber of wonders’ ! swarovski crystalsचा वापर करून अतिशय सुंदर अशा विविध कलाकृती येथे अनेक artists नी बनवल्या आहेत. प्रत्येक दालनाची theme वेगळी..रचना वेगळी..! प्रत्येकांनी त्याचे करायचे interpretation  सुद्धा वेगळे..एका chamber चा उल्लेख इथे जरूर करीन..त्याचे नाव होते heros of peace.. इथे स्क्रीनवर दिसले ते आपले महात्मा गांधी! आणि पाऊले थबकली..मन अभिमानाने भरून आले.. andre heller ह्या प्रसिद्ध multimedia artist च्या कल्पनेतून साकारलेले हे जागतिक शांततेचे आवाहन करणारे दालन आहे.. दलाई लामा..मार्टिन किंग लुथर..ह्यांचे हि videos इथे दिसले. सर्वात शेवटी आहे तो बायकांचा विशेष लाडका म्हणजे  swarovski jwellery ची विक्री होते तो chamber.. आम्ही पण इथे थोडी फार खरेदी केली..

ह्या museum शिवाय इथे बघण्यासारखे आहे ते crystal cloud आणि   mirror pool! crystal cloud मध्ये ८,00,000 crystals चा वापर केला आहे! आणि ह्या clouds वर जेव्हा सूर्याचा प्रकाश पडतो आणि त्याचे जेव्हा पाण्यात प्रतिबिंब पडते तेव्हा हजारो चांदण्या लखलखताहेत असे वाटते!!! तर ऑस्ट्रियाला आल्यावर आवर्जून पाहण्यासारखे हे museum आहे..

आनंदी चेहेरे..अर्थात shoppingनंतरचे!
‘chamber of wonders’ मधील काही crystal installations…

भाग १- Inssbruck

हा खरतर आमच्या प्रवासाचा पहिला दिवस नाही! पण सुरुवात इथूनच करणार आहे मी..कारण  Europe मधील सृष्टीसौन्दार्याचा उच्चांक, परिसीमा, सर्वोत्तम  जे काय म्हणून असते ते इथेच ‘याची डोळा याची देहा’ दिसले! त्या दिवशी सकाळी तशी आरामातच उठले..रात्री खूप उशिरा जर्मनीमधून Austria तील inssbruck जवळच्या tulfes ह्या गावातील Hotel  Gasthof Neuwirt  मध्ये check-in केले होते. रात्रीच्या अंधारात एवढेच समजत होते की फक्त वळणावळणाच्या रस्त्यानी वर उंचावर चाललो आहोत. खाली inssbruck गाव दिसत होते आणि वर गडद निळे आकाश! बस! गावात सगळीकडे सामसूम झाली होती..रात्रीचे ९-९.३० झाले होते.

हॉटेल्स आणि दुकाने तर कधीच बंद झाली होती. आमच्या Hotel च्या reception वर कुणीच नव्ह्ते.मग त्याच्या manager ला फोन केला.. तर त्याच्या झोपेची मध्यरात्र झाली होती! टेबलवर तुमच्या नावाच्या चिठ्या आणि रुमच्या किल्या ठेवल्या आहेत…हॉटेल मागच्या मोकळ्या जागेत कार पार्क करू शकता…एवढे बोलून त्याने फोन ठेवला! मग त्याला असे झोपेतून उठवल्याबद्दल चार वेळा sorry बोलून दुसऱ्या मजल्यावरच्या रूम मध्ये जिन्याने bags ओढत घेऊन गेलो! सगळ्यांनाच भूक लागली होती.. तेव्हा खाली inssbruck मध्ये जाऊन vapiano ह्या Italian restaurant मध्ये जाऊन जेवायचे ठरवले. हे हॉटेल गावातील एका  मोठ्या shopping/commercial area मध्ये होते….तिथे ikea आणि इतर अनेक branded दुकाने होती. Offices होती..hotels होती. पण उशीर झाल्यामुळे काही hotels तर काहींची kitchens बंद झाली होती. फक्त एक late night चालू असलेले Macdonalds  दिसले आणि हुश: झाले! जेवण करून हॉटेल वर आलो….हॉटेल शेजारीच जरा नवीन धाटणीचे छोटेसे church होते.. आणि त्याला लागून होती दफनभूमी!! रात्रीचे १२ वाजले होते गाडी पार्क करून त्याच्या शेजारून येताना जरा भीतीच वाटली..वर येऊन गुपचूप झोपलो!

हा.. तर ह्या अश्या सगळ्या पार्श्वभूमीवर सकाळी तशी आरामातच उठले..

खिडकीचे पडदे उघडले आणि balconyचे दार उघडून बाहेर आले.. आणि समोरचे दृश्य बघून आपण अजून स्वप्नात आहोत का खरच जागे आहोत तेच समजेना!!! २ मिनिटे स्तब्धपणे समोरचा तो निसर्गाचा अविष्कार बघत बसले!! भानावर आले तेव्हा पहिल्यादा हाका मारून अमोल ला बोलावले.

त्या रात्रीच्या अंधारात एवढे काही मनोहारी आपल्या शेजारीच आहे याची पुसटशीही कल्पना आली नव्हती!

तर..मी जिथे उभी होते त्या balcony पासून जिथवर नजर लांब जात होती तिथे चहूबाजूंनी उंच पर्वत दिसत होते. आणि प्रत्येकाच्या डोक्यावर पांढरा मुकुट घातल्याप्रमाणे बर्फाने आच्छादन केले होते.त्याच्यामागे आकाशाच्या निळाईवर मधून मधून पांढरेशुभ्र ढगांचे गुच्छ होते. पर्वताच्या पायथ्यापर्यंत हिरवीगार कुरणे पसरली होती..त्यात अधेमधे छोटी पिवळी फुले उमलली होती..कुरणांना मधूनच एखादे खुरटे बांबूचे कुंपण छेदून जात होते..पर्वताच्या पायथ्याशी pine ची झाडे होती..बर..त्यातपण..कुराणाचा, झाडाचा, पर्वतावरील झाडांचा प्रत्येकाचा आपलाच असा वेगळा हिरवा रंग होता.. कुरणात चरणाऱ्या गायींच्या गळ्यातील नाजूक वाजणाऱ्या घंटा..मधूनच किलबीलणारे पक्षी..अहाहा..स्वर्गीय आनंद होता हा! डाव्या बाजूला गावातून जाणारा रस्ता होता.. त्याच्या बाजूनी दुमजली उतरत्या छपरांची कौलारू लाकडी टुमदार घरे होती..त्यामागे असलेल्या उतरत्या डोंगरावर winter मध्ये skiing केले जाते.

मग तिथेच balcony मध्ये असलेल्या coffee table वर निवांत बसून खूप वेळ हे नयनसुख घेत राहिले..

नंतर पुढे 3 दिवस हि अशी आणि यापेक्षा कितीतरी सुंदर अनेक दृश्ये सबंध ऑस्ट्रियाभर पाहायला मिळाली पण म्हणतात ना ‘पहिली बार एकही बार आता है! त्याप्रमाणे ऑस्ट्रिया चे हे पहिले दर्शन खास  आठवणीत राहिले.

आज checkout करून Salzberg ला जायचे होते. आणि जाताना Swarovski Crystal World बघायचे होते..आमचे हॉटेल स्वरोस्की पासून १०-१५ मिनिटाच्या अंतरावर होते. पटापट breakfast उरकून सामान गाडीत load केले.निघे पर्यंत १०.३० वाजले होते. काल रात्री पाहिलेली चर्च शेजारची ती थडगी चक्क आज अजिबात घाबरवत नव्हती!!

ह्यावेळी आम्ही मुख्य inssbruck गावात गेलो नाही.. Inssbruck हे ऑस्ट्रिया मधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ऑस्ट्रियाच्या पश्चिमेकडे असलेले हे गाव Alpsच्या पर्वतरांगांनी वेढलेले wintersports चे खास आकर्षण आहे.हे त्याच्या imperial आणि modern architecture साठी सुद्धा प्रसिध्द आहे. हे Tyrol stateचे capital आहे. इथे बरेचसे लोक german भाषा बोलतात. Switzerland मधील Alps पर्वतात उगम पावलेली Inn नावाची नदी ह्या शहरातून वाहते! तर swarovski बद्दल उद्याच्या post मध्ये लिहिते!

बाल्कनी तून दिसणारा हाच तो अप्रतिम view!!
आणि हा डावीकडचा रस्ता..
हॉटेल मधून दिसणारा अजून एक view..
Design a site like this with WordPress.com
Get started